‘टायगर जिंदा है’चे जयपूरमध्ये जाळले पोस्टर, वाल्मिकी समाजाचा विरोध

0

अभिनेता सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ चित्रपट शुक्रवारी (22 डिसेंबर) प्रदर्शित झाला. परंतु चित्रपट प्रदर्शित होताच सलमानच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसत आहे. वाल्मिकी समाजावर आक्षेपार्ह टिपण्णी केल्यामुळे जयपूरमध्ये सलमानच्या चित्रपटाला विरोध केला जात आहे.

चित्रपटगृहाबाहेर ‘टायगर जिंदा है’ चे पोस्टर्स जाळण्यात आले. तसेच घोषणाबाजीही करण्यात आली. वाल्मिकी समाजाने शिल्पा शेट्टी आणि सलमान खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. दोघांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता चित्रपटाला विरोध केला जात आहे.

तसेच ‘देवा-एक अतरंगी’ या मराठी सिनेमाला ‘टायगर जिंदा है’मुळे स्क्रीन्स मिळत नव्हत्या. त्यामुळे मनसेने चित्रपटगृहाबाहेर आक्रमक आंदोलन केले होते. आता ‘देवा’ चित्रपटाला 225 स्क्रीन्स देण्यात आल्या आहेत. परंतु राजस्थानमध्ये ‘टायगर जिंदा है’च्या अडचणी वाढल्या आहेत.

‘टायगर जिंदा है’च्या प्रमोशनदरम्यान सलमान खानने डान्स टॅलेंटविषयी सांगताना जातीवाचक शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर शिल्पा शेट्टीनेही ती घरी कशी दिसते हे सांगण्यासाठी याच शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर वाल्मिकी समाजाने शिल्पा आणि सलमान यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून याची कॉपी फेसबुकवर शेअर केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.