झीनत अमान यांनी दाखल केली बलात्काराची तक्रार, आरोपीला अटक

0

अभिनेत्री झीनत अमान यांनी एका व्यावसायिकाच्या विरोधात मुंबईच्या जुहू पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

झीनत अमान यांनी एक महिन्यापूर्वीदेखील त्या व्यावसायिकाने तिला धमकावण्याचा आणि पाठलाग केल्याचा आरोप केला होता. त्याच्यावरील स्टॉकिंग आणि धमकी दिल्याची तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की मुंबईचा व्यावसायिक सरफराज अर्थातच अमन खन्ना (38) झीनत अमान यांचा पाठलाग करत होता. ही व्यक्ती झीनत यांना अश्लिल मेसेज पाठवत होता. तसेच आरोपीने झीनत यांच्या घरात घुसुन विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याने सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

झीनत अमान यांनी सत्यम शिवम सुंदरम, धर्मवीर, हरे राम हरे कृष्णा, यादो की बारात, लावारिस यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांत काम केले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.