ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन

0

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. त्यांच्या मुलांनी आणि कुटुंबियांनी बुधवारी (१४ मार्च) याबाबत घोषणा केली. केम्ब्रिज येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे. आपल्या शोध आणि ह्युमरने संपूर्ण जगाला प्रेरित करणारे आमचे वडील सदैव आमच्या आठवणीत राहतील, अशा भावना त्यांची मुले लूसी, रॉबर्ट आणि टिम यांनी व्यक्त केल्या.

पृथ्वीच्या उत्पत्तीचा आणि कृष्णविवरांसंदर्भात त्यांनी मांडलेल्या सिद्धांतांना वैज्ञानिक जगात खूप महत्त्वपूर्ण मानले जातात. शिवाय, त्यांनी भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र हे किचकट विषय सामान्यांनाही समाजावे, यासाठी लिखाण केले. त्यांचे ‘ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम’ हे पुस्तक विशेष गाजले होते. हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ साली इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड येथे झाला. हॉकिंग एनर्जी, हॉकिंग्ज रेडिएशन यांसह अनेक शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.