ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

0

विधान परिषदेचे माजी उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे याचे बुधवारी (४ जानेवारी) सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी त्यांची प्राणज्योत मालावली. मृत्युसमयी ते ६८ वर्षांचे होते.

डावखरे यांच्या निधनाने ठाणे जिल्ह्यातील राजकारणातला एक वजदार नेते काळाच्या पडद्याआड गेले आहे. आज (५ जानेवारी) दुपारी ३ वाजता ठाण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

डावखरे शरद पवारा यांचे अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक होते. त्यांची सर्वच पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध होते. शरद पवारांप्रमाणे ठाकरे यांच्या कुटुंबियांशीही त्यांचा स्नेह होता. डावखरे यांच्या निधनावर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉम्बे हॉस्पिटल येथे जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.