जेष्ठ साहित्यिक आणि लेखक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन

0

जेष्ठ साहित्यिक आणि लेखक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे आज पहाटे दिर्घ आजाराने निधन झाले. नुकतेच केंद्र शासनाने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते.

पानतावणे यांचा जन्म 28 जून 1937 रोजी नागपूरमध्ये झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नागपूर येथेच पूर्ण झाले. ते महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादला आले होते. त्याच महाविद्यालयात म्हणजे डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापिठाच्या विभागाचे प्रमुख झाले आणि त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. ते पहिल्या मराठी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचे पु. ल. देशपांडे आणि कुसुमाग्रज यांच्याशी घरगुती संबंध होते. अस्मितादर्श या त्रैमासिमकातून त्यांनी दलित चळवळ चालवली होती.

मुल्यवेध, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, मुकनायक, दलित प्रबोधन, वादळाचे वंशज, प्रबोधनाची दिशा, पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हलगी, चैत्य, दलित वैचारिक वाङमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड, प्रकृती आणि प्रवृत्ती, शोध आणि संवाद, स्मितशेष हे पानतावणे यांनी लिहिलेले वैचारिक आणि समीक्षात्मक ग्रंथ आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार साहित्यातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम डॉ. पानतावणे यांनी केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.