जेष्ठ गायिका डॉ. आशालता करलगीकर यांचे निधन

0

ज्येष्ठ गायिका डॉ. आशालता करलगीकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. शुक्रवारी (२९ डिसेंबर) रात्री १२:३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 75 वर्षांच्या होत्या. शनिवार (३० डिसेंबर) सकाळी ११ वाजता प्रतापनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्‍यात आले.

गेल्या २ महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आशालता यांना त्यांच्या सुमधुर आवाजामुळे ‘आंध्रलता’ ही पदवी बहाल केली होती. मुळच्या कर्नाटकातील विजापूरच्या असलेल्या आशाताई लग्नानंतर औरंगाबाद इथे स्थायिक झाल्या होत्या. एलआयसीमधून सेवानिवृत्त झालेल्या आशाताईंना सूरममी, सुरश्री असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. अतिशय नम्र, लाघवी व अभ्यासू गायिका गमावल्याने औरंगाबादच्या कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

हैदराबाद येथे लहानपणीच उत्कृष्ट गायिका म्हणून त्यांनी नाव कमावले होते. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, नीलम संजीव रेड्डी, लता मंगेशकर, मोहमद रफी यांसारख्या मान्यवरांसमोर त्यांनी कला सादर केली होती. 1963 साली अफगानिस्तान मधील काबूल येथे पं. भीमसेन जोशी, पं. सामताप्रसाद, ज्येष्ठ नृत्यांगना इंद्राणी रहमान अशा नामांकित कलाकारांबरोबर त्यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला होता. त्यांनी एका तेलुगू आणि हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.