जिग्नेश मेवाणी-उमर खालिद विरोधात गुन्हा दाखल

0

आमदार जिग्नेश मेवाणी आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचा विद्यार्थी उमर खालिद यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. पुणे येथील शनिवार वाड्यावर ३१ डिसेंबर रोजी झालेल्या ‘एल्गार परिषदे’त भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मंगळवारी (२ जानेवारी) अक्षक बिक्कड आणि आनंद दौंड या दोन तरुणांनी पुणे येथील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुणे येथे शनिवार वाड्यावर झालेल्या कार्यक्रमात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप जिग्नेश आणि उमर खालिद यांच्यावर लावण्यात आला आहे्.

जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांनी आपल्या भाषणातून एका खास वर्गातील लोकांना रस्त्यावर उतरण्यासाठी भडकवले होते. या दोघांच्या भाषणांनंतर विशेष वर्गातील लोक विरोध करण्यासाठी रस्त्यावर आलेत. नंतर या घटनेने हिंसेचे वळण घेतले, असा आरोप करण्यात आला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.