जिओ मेंबर्ससाठी खुशखबर, एक वर्षासाठी मिळेल फ्री प्राइम मेंबरशीप

0

रिलायन्स जिओच्या ‘प्राइम’ ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. जिओच्या ग्राहकांची 31 मार्च रोजी प्राइम मेंबरशीपची मुदत संपणार होती. मात्र जिओने पुढील एक वर्षासाठी ही मुदत वाढवली आहे. त्यामुळे सध्याच्या प्राइम मेंबरर्सना पुढील एक वर्षापर्यंत प्राइम ऑफरचे सर्व लाभ मिळणार आहेत.

जिओची प्राइम मेंबरशीप घेण्यासाठी 99 रुपये द्यावे लागत होते. ही मुदत आज म्हणजे 31 मार्च रोजी संपणार होती. मात्र जिओने या ऑफरची मुदत वाढवली आहे. त्यामुळे नवीन युझर्सना जिओचे 99 रुपयांत प्राइम मेंबरशीप घेता येऊ शकते.

‘मायजिओ’ अॅप डाऊनलोड करून सध्याच्या प्राइम मेंबरशीप ग्राहकांना मेंबरशीप सुविधा कायम करण्यासाठी एक पर्याय दिलेला असेल तो निवडावा लागेल. त्यानंतर ग्राहकांना जिओ फ्री मेंबरशीपचा लाभ मिळवता येईल.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.