जिओची ग्राहकांसाठी नवीन ऑफर, 1 नव्हे आता मिळणार 1.5 जीबी डेटा

0

रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एअरटेलच्या प्लॅन्सला टक्कर देत जिओने नव्या प्लॅनची घोषणा केली आहे. या ऑफरमुळे ग्राहकांना आता अनलिमिटेड इंटरनेट वापरण्याची मोठी संधी मिळणार आहे.

नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये जास्त डेटा देण्याची घोषणा करण्यात आली असून जिओने 98 रुपयांचा नवा प्लॅनही ग्राहकांसाठी आणला आहे. यात 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह 2 जीबी डेटा मिळणार आहे. जुन्या रिचार्ज प्लॅनमध्ये बदल करत जिओ आता जास्त डेटा देणार आहे. पूर्वी 147 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह 1 जीबी डेटा मिळत होता. मात्र याऐवजी आता 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. जिओच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल.

349, 399 आणि 499 रुपयांचा प्लॅन वापरणाऱ्या ग्राहकांना आता दररोज 1 जीबी ऐवजी 1.5 जीबी डेटा मिळेल. या प्लॅन्सच्या व्हॅलिडिटीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये.

जिओच्या ज्या प्लॅन्समध्ये अगोदर 2 जीबी डेटा मिळत होता, त्यातही बदल केला आहे. तसेच 198, 398, 448 आणि 498 रुपयांच्या प्लॅनमध्ये आता 1.5 जीबीऐवजी 2 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनच्याही व्हॅलिडिटीत बदल केलेला नाहीये. रिलायन्सचा हा नवीन डाटा प्लान 26 जानेवारीपासून लागू होणार आहेहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.