जम्मू-काश्मीरमध्ये 13 दहशतवाद्यांचा खात्मा, 3 जवान शहीद

0

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये भारतीय जवानांनी 13 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच एकाला जिवंत पकडण्यात यश आले आहे. मात्र दहशतवाद्यांशी लढत असताना 3 भारतीय जवान शहीद झाले आहेत. तसेच 4 स्थानिक नागरिक ठार झाले आहेत.

शनिवारी (31 मार्च) रात्रीपासून जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग, कचदूरा आणि शोपियानमध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना उत्तर देण्यास सुरुवात केली होती. शोपियान जिल्ह्यात दहशतवादी लपले होते. याबाबत माहिती मिळताच जवानांनी धडक कारवाई सुरु केली.

या लढाईत 13 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. या चकमकीत 3 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या चकमकीत 4 स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. खबरदारी म्हणून काश्मीर खो-यात रेल्वे आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यात मारले गेलेले 7 दहशतवादी हे स्थानिक रहिवासी होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.