जम्मूमध्ये पाकिस्ताची फायरिंग, २ स्थानिक नागरिकांचा मृत्यू

0

पाकिस्तानने पुन्हा एकदा आरएसपुरा सेक्टरमध्ये सीजफायरचे उल्लंघन केले. सीमेलगत राहणाऱ्या स्थानिक नागरिकांवर पाकिस्तानने गोळीबार केला. शुक्रवारी (१८ जानेवारी) सकाळी ६:३० वाजेपासून सांबा अरनिया, आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार करून दहशत माजवली. या गोळीबारमध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक महिला तर एक लहान मुलगा आहे. तसेच तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. आरएसपुरा सेक्टरपासून रामगढ सेक्टरपर्यंतचा परिसरात सकाळी ६:३० वाजेपासून गोळीबार सुरु आहे. भारतीय जवान यांच्या गोळीबाराला सडेतोड उत्तर देत आहेत. पाकिस्तानने शुक्रवारी भारतीय सेनेच्या ४० चौक्यांवर आणि ५० गावांवर निशाणा साधून फायरिंग केली.

बुधवारी रात्री पाकिस्तानी सेनेने सीजफायरचे उल्लंघन करून भारतीय सीमेवर गोळीबार केला होता. आरएसपुरा सेक्टरमध्ये केलेल्या या फायरिंगमध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला होता. तर तीन जवान आणि तीन नागरिक जखमी झाले होते. पाकिस्तानच्या या फायरिंगला भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर दिले होते.

बुधवारी रात्री फायरिंग
बीएसएफच्या एका अधिका-याने सांगितले की, पाकिस्तानने आरएस पुरा सेक्टरमध्ये बुधवारी रात्री साधारण ११ वाजता फायरिंग केली. नंतर भारताकडूनही पाकिस्तानी चौक्यांवर फायरिंग केली गेली होती. यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला तर तीन जखमी झाले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.