चार ऐकर ऊस जळुन खाक ! दोन दिवसानंतरही ‘महसुल’चा पंचनामा नाही

0

चार ऐकर ऊस जळुन खाक, पाच लाखाचे नुकसान! घटना होऊन दोन दिवस झाले तरी महसुलचा अधिकारी फिरकला नाही

अंकुशनगर  : महावितरणच्या वीज पुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या तारा मध्ये घर्षणा झाल्यामुळे शेतातील 4 एकर उसाला आग लागून तोडणीस आलेला ऊस जळून खाक झाला आहे हि  घटना  अंबड तालुक्यातील शिवाजी नगर ( महाकाळा)  येथील तुकाराम तुळशीराम आदमाने , सखाराम तुळशीराम आदमाने व पांडुरंग जालिंदर आदमाने  यांचा   गहीनिनाथ नगर शिवारातील गट न.62 मधील 4 एकर ऊस अंदाजे चार लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी 8 डिसें रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास घडली   आग विझवण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी  मदत केली  आग आटोक्यात आली नसती तर पाच व्हेक्टर पेक्षा जास्त ऊस जळुन खाक झाला आसता.
तुकाराम आदमाने इतर शेतकऱ्यांनी यांनी वेळोवेळी लोंबकळलेले तारा संदर्भात अनेकदा तोंडी  महावितरणच्या अधिकाऱ्याना तक्रारी केल्या होत्या मात्र अधिकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल.

                          
विज खात्याच्या अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे चार ते साडे चार लाखाचे नुकसान झाले आहे. ऊस जाळ्याल्या प्रकरणी महावितरणच्या विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ऊस पिकाचे जळीत होऊन दोन दिवस झाले आसता नाही महसुलच्या अधिकऱ्यांनी साधा पंचनामाही केलेला नाही. तहसीलदार तसेच तलाटी, ग्रामसेवक यापैकी कोणीच या घटनेकडे लक्ष दिलेले.

या महिन्यामध्ये तारामध्ये घर्षण होऊन अनेक शेतकरच्या उसाला आग लागण्या अनेक घटना घटलेल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कुंभकर्ण झोपेत असणाऱ्या सरकारी तसेच महावितरणच्या आधिकऱ्याला जाग कधी येणार आसा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून होत आहे.

बाधीत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया :
तुकाराम आदमाने ( शेतकरी) –
मी अनेक वेळा वीज खात्याच्य अधिकऱ्या शेतात लोंबखळत असणाऱ्या तारांविषयी सांगीतल होत, मात्र त्यांनी त्याकड लक्ष दिल नाही, त्यामुळं माझा ऊस जळाला.

सखाराम आदमाने ( शेतकरी) :
माझे आणि भावाचे शेतातील ऊस फक्त लाईट खात्याच्या अधिकाऱ्यांच्या चाल ढकलीमुळेच जळाला आहे. लाईट खात्यांनी झालेल्या।नुसकांनीच भरपायी करुन द्यावी चार लाखा रुपायचे नुसकान झालेय.

पांडुरंग आदमाने (शेतकरी) :
ऊस जळीताची घटना होऊ दोन दिवस झाले तरी अजुन महसूलच्या अधिकऱ्यांनी साधा पंचनामाही केलेला नाही. तोडणीला आलेसा ऊस जळुन खाक झालाय. चार ते पाच लाखाचे नुसकान झालेय.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.