गुजरात-राजस्थानच्या निवडणूकीवर शिवसेनेची भाजपवर टीका

0

‘गुजरात निवडणुकीत ट्रेलर दाखवला आणि राजस्थानची पोटनिवडणूक इंटरव्हल आहे तर 2019 मध्ये संपूर्ण पिक्चर पूर्ण होणार आहे.’ अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

‘पुढील म्हणजे 2019ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा संकल्प शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे आता संकल्प मागे घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. एकदा बाण सुटला की तो परत येत नाही’, असेही संजय राऊत म्हणाले.

23 जानेवारी 2018 ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने 2019ची निवणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. औपचारिकरित्या 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष भाजपसोबत युती करणार नसल्याचे शिवसेनेने जाहीर केले होते.

2013 मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले होते. मात्र आता भाजपला येथे पसंती मिळत नसल्याचे दिसते. राजस्थान येथील अजमेर आणि अलवर या लोकसभेच्या दोन जागा तर मांडलगढ या विधानसभेच्या एका जागेसाठी 29 जानेवारीला पोटनिवडणूक पार पडली. पोटनिवडणुकीत काँग्रेसने तिन्ही जागांवर बाजी मारत भाजपचा पराभव केला. अलवरमध्ये काँग्रेसच्या करण सिंह यादव यांनी भाजपच्या जसवंत सिंह यांना 1 लाख 56 हजार 319 मतांनी पराभूत केले. मांडलगढ विधानसभेच्या जागेवर काँग्रेसच्या विवेक धाधड यांनी भाजप उमेदवार शक्ति सिंह हांडा यांचा 12 हजार 976 मतांनी पराभाव केला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.