गायक दलेर मेहंदींना मानव तस्कर प्रकरणी अटक, २ वर्षांची शिक्षा

0

प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांना मानव तस्कर प्रकरणी पंजाबच्या पटियाला न्यायालायने दोषी ठरवत २ वर्षांच्या तुरुंवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांनी त्वरित दलेर मेहंदीला अटक केली आहे. अवैधरित्या लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप दलेर मेहंदी आणि त्यांचा भाऊ शमशेर सिंह यांच्यावर आहे. त्यासाठी त्यांनी लाखो रुपये घेतल्याचेदेखील सांगितले जाते.

हे २००३ मधील प्रकरण असून तब्बल १५ वर्षांनी दलेर मेहंदी यांना दोषी ठरवले आहे. गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. दलेर मेहंदीविरोधात एकूण ३१ प्रकरणी आरोप होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.