गाजराचे आहेत अनेक फायदे, दूर होतील या समस्या

0

आजकालच्या धावपळीच्या जिवनात आपण स्वताकडे कमी आणि कामाकडे जास्त लक्ष देतो त्यामुळे अनेक आजार जडतात. तसेच कामामुळे जागरण झाले कि पचनशक्तीच्या समस्या जाणवतात. अशा अनेक छोट्या मोठ्या समस्या आपल्यालाल दररोज जाणवत असतात. या समस्यावर आपण घरगुती उपाय करू शकतो. आपली उर्जा टिकून राहण्यासाठी दररोज गाजर खाल्ले पाहिजे. गाजरामुळे कमकुवतपणा कमी होतो. तसेच डोळ्यांचे आणि पोटाचे विकारसुद्धा दूर होतात. आज आम्ही तुम्हाला गाजराचे काही फायदे सांगत आहोत.

* गाजरात बिटा कॅरोटिन असल्याने ते कॅन्सरला प्रतिबंधक ठरते. तसेच गाजरामुळे पचनशक्ती वाढते.
* गाजरच नव्हे तर त्याच्या पानामध्येसुद्धा लोह असते. त्यामुळे अॅनिमियाची समस्या दुर होते.

* हिवाळ्यात गाजर खाल्यास शरीरात उब राहते.
* गाजरामध्ये व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘ई’चे प्रमाण असते. त्यामुळे डोळ्यांची कमकुवतात दूर होते तसेच त्वचा आणि केसांना निरोगी आणि चमकदार ठेवते.

* गाजर चावून खाल्ल्याने आतड्यांची स्वच्छता होते. तसेच बध्दकोष्ठसारख्या समस्यापासुन आराम मिळतो.
* गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्यास त्वचा चमकादर दिसू लागते.

* एक ग्लास गाजरच्या रसामध्ये एक कप कारल्याचा रस टाकून प्यायल्याने डायबिटीजपासुन लाभ मिळतो.
* गरोदर महिला आणि होणा-या बाळासाठी गाजराचा ज्यूस खुप फायदेशीर असते.

* एक ग्लास गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्यास स्मरणशक्ती वाढते.
* तोंड आले असेल तर गाजराचा ज्यूस तोंडात घेऊन त्याने गुळणी करावी. यामुळे तोंड येण्याची समस्या दूर होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.