खासदार खैरेंनी केलं रामदास कदमांना क्लीन बोल्ड! पण कोण झालं धावबाद ?

खैरेंशी पंगा कदमांची गछंती अन् खासदारकीचे गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांना 'मातोश्री'चा चेक

0

अभय निकाळजे  (वरिष्ठ पत्रकार) : औरंगाबाद शिवसेनेच्या भाषेत ‘संभाजीनगर’ची शिवसेना ही खासदार चंद्रकांत खैरेंच्याच नेतृत्वाखालीच काम करेल, हा स्पष्ट इशारा ‘मातोश्री’वरून दिला गेला आहे. त्यामुळेच रामदासभाई कदमांना औरंगाबादच्या पालकमंत्री पदावरून हटविले गेले. भाईंच्या पायी माथा टेकवून खासदारकीचे ‘पतंग’ उडविणाऱ्यांचे पतंग कापण्यात खैरे यशस्वीच झाले.

खैरेंच्या इच्छेतील संभाजीनगरतील (औरंगाबाद) शिवसेनेवर त्यांनी पकड घट्ट केली आहे. त्यामुळे कधी नव्हे ते पहाटे खैरेंच्या घरी जाऊन ‘चॅलेज’ करणारे आणि शिवशाही अभियानाच्या माध्यमातून थेट खासदारकीची उमेदवारी मागणाऱ्यांचे ऐन मकर संक्रांतीला पतंग कापले गेले आहेत. यापुर्वी खैरेंनी त्यांच्याशी पंगा घेणाऱ्यांना एकतर घरची वाट दाखविली किंवा त्यांना राजकीय शरणागती पत्करायला लावली.

मग ते पहिले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुभाष पाटील असोत की ज्येष्ठनेते कै. मोरेश्वर सावे असोत. तिच गत त्यांनी शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांचीही केली.

ज्यांनी ज्यांनी खैरेंशी पंगा घेतला, त्यांना त्यांनी ‘मातोश्री’कडे दाद मागून काटा काढला. खासदार खैरेंना जर स्वपक्षीयांकडून कोंडी झाली तर इतर पक्षांच्या कूरघोड्यांचा कसा सामना करायचा ? हे करण्यामागे मातोश्रीवरून हा विचार झाला असेल. त्यामुळे त्यांनी भाईंना नांदेडमध्ये प्रतापदादा चिखलीकरांच्या गद्दारीला ‘राजकीय चेक’ देण्यासाठी धाडले.

ज्यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे, ते डाॅ. दीपक सावंत यांची उस्मानाबाद पालकमंत्री असतांनाची खेळी फारशी प्रभावी नाही.वक्तृत्वकौशल्य किंवा प्रभाव पाडू शकतील असे डाॅ. सावंत नाहीत. 1993 मध्ये ते औरंगाबादला प्लेग सदृष्य आजार फोफावलेला असतांना शिवसेनेतर्फे आरोग्य सेवा देण्यासाठी आले होते.

त्यामुळे डाॅ. सावंत यांना पालकमंत्री केल्याचा संघटनात्मक पातळीवर शिवसेनेला फायदा होणारच नाही. पण खासदार खैरेंना स्ट्रँग करतांना हा तोटा सहन करायला शिवसेना तयार आहे. पण खैरेंच्याविरोधातील बंडखोरांना शांत करण्याची खेळी सध्य स्थितीला तरी यशस्वी झाली दिसते आहे.
सगळ्याच पक्षातील खैरेंमुळे अस्वस्थ
खैरे दोनदा आमदार आणि चारवेळा खासदार म्हणून निवडून आलेत. गेल्या 30 वर्षांपासुन सत्तेत खैरे आहेत. त्यामुळे स्वतःला प्रस्थापित म्हणवून घेणाऱ्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. म्हणुन खैरेंच्याविरूद्ध त्यांच्या पक्षातील प्रस्थापितांना बंड करायला लावले जाते. पण त्यांच्यावरही कुरघोडी करण्यात खैरे यशस्वी होतांना दिसता आहेत. आता औरंगाबाद लोकसभा मतदार संघात खैरेंच्याविरोधात कोण उमेदवार ? हा सगळ्यांनसाठीच प्रश्न आहे.

माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांना हरविल्यावर असे म्हणतात की, दस्तुरखुद्द विलासराव देशमुखांनीही खैरेंच्याविरोधात निवडणूक लढविण्यास नकार दिला होता.

त्यामुळे खैरेंना त्यांच्याच पक्षातील बंडखोराद्वारे चेक दिला जाऊ शकतो असे जिल्ह्यातील प्रस्थापितांना वाटते. म्हणून त्यांच्यात म्हणजे खैरेंच्याच चेल्याचपाट्यांना घेऊन बंडाचे निशाण फडकवितात. पण तेही खैरे मोठ्या खुबीने परतवुन लावतात.
कदमाच्या भरवाशावर ज्यांनी ज्यांनी चंद्रकांत खैरेना शह देण्याचा पर्यंत्न केला त्यांची यापुढील वाटचाल कशी राहते ते येत्या काळात पहाने औत्सुक्याचे रहणार आहे. सध्य स्थितीत तरी खासदार खैरेच सबसे बढे भाई ठरलेले दिसतायत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.