क्लिक करून पहा ‘चांदणी’चे काही जुने फोटो

0

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी दुबईत निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून अनेकांना धक्का बसला. अगदी सुंदर आणि लोभसवाणे रूप असलेली ही सौंदर्यवती अशी अचानक सोडून जाईल याचा कुणीही विचार केला नव्हता.

त्या कुटुंबियांसह दुबईमध्ये मोहितमारवाहच्या लग्न सोहळ्यासाठी गेल्या होत्या.

३०० चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या श्रीदेवी यांचा ‘मॉम’ हा शेवटचा चित्रपट ठरला. त्यापूर्वी त्या २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटात दिसल्या होत्या.

१९८३ मध्ये रिलीज झालेल्या ‘हिम्मतवाला’ चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

श्रीदेवीचे सुपरहिट चित्रपट…

श्रीदेवी यांनी ‘सोलहवा सावन’ (१९७८), ‘हिम्मतवाला’ (१९८३), ‘मवाली’ (१९८३), ‘तोहफा’ (१९८४), ‘नगीना’ (१९८६), ‘घर संसार’ (१९८६), ‘आखिरी रास्ता’ (१९८६), ‘कर्मा’ (१९८६), ‘मि. इंडिया’ (१९८७), ‘लाडला’ सह ३०० चित्रपटामध्ये काम केले.

श्रीदेवी यांनी निर्माता बोनी कपूर यांच्यासोबत १९९६ मध्ये लग्न थाटले होते. दोघांचे प्रेमप्रकरण १९८७ मध्ये आलेल्या ‘मि. इंडिया’च्या शूटिंग दरम्यान सुरु झाले होते.

श्रीदेवी आज जशा आजच्या काळात दिसत होत्या तसाच त्या पूर्वीदेखील दिसायच्या. त्यांच्या सौदर्याचे लाखो दिवाने होते. त्याचे कारण म्हणजे त्यांनी आपल्या २९ वेळा प्लास्टिक सर्जरी केली होती.

मात्र अभिनयातून त्यांनी त्यांच्यातील बालकलाकार नेहमी जपला. त्यांच्या बोलण्यातील अदा प्रेक्षकांना भुरळ घालत होती. तुम्ही श्रीदेवी यांचे असे फोटो कदाचितच यापूर्वी कधी पाहिले असतील…

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.