क्रिकेटपटू विजय झोल अडकला लग्नगाठीत

0

शिवसेनेचे आमदार तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची कन्या दर्शना आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू विजय झोल यांचा लग्नसोहळा रविवारी (३१ डिसेंबर) जालना येथे अगदी साध्या पद्धतीने पार पडला. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक राजकीय मान्यवर लग्नात उपस्थित होते.

विजय प्रसिद्ध क्रिकेटपटू तर दर्शना उच्चशिक्षित असल्याने हा लग्नसोहळा साधेपणाने झाला. जालना येथील भाग्यनगर वसाहतीतील खोतकर यांच्या निवासस्थानी झालेल्या या लहनसोहळ्याला जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम, एकनाथ शिंदे, महादेव जानकर गुलाबराव गावंडे, उपस्थित होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनीही वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

या लग्नसोहळ्याच्या लग्नपत्रिका देखील छापण्यात आल्या नव्हत्या. नातेवाईक आणि अतिशय जवळच्या अगदी मोजक्या खास पाहुण्यांच लग्नाचे निमंत्रण देण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यांचे बंधू आणि जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्या मुलीचा विवाहदेखील साधेपणानेच पार पडला होता.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.