कोची शिपयार्डमध्ये स्फोट, ४ जण ठार तर १३ जखमी

0

कोची येथील शिपयार्ड येथे दुरूस्तीसाठी आलेल्या ओएनजीसीच्या जहाजावर झालेल्या स्फोटात ४ कामगार ठार झाले असून १३ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. या जहाजाचे नाव ‘सागर भूषण’ आहे. हा स्फोट कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ओएनजीसीचे हे जहाज दुरूस्तीसाठी कोची शिपयार्ड येथे आले होते. जहाजावरील पाण्याच्या टाकीत हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी धाव घेऊन पोलीस आणि बचाव पथकाने बचावकार्य सुरू केले आहे.

या दरम्यान, दोन कामगार त्या टाकीत असल्याचे समजते, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून गेवीन आणि रामशाद अशी त्यांची नावे आहेत.आज महाशिवरात्री असल्यामुळे कोची शिपयार्ड आज बंद आहे. मात्र, दुरूस्तीच्या कामासाठी काही विभाग सुरु आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.