केस गळत असतील तर करा हे उपाय, होईल फायदा

0

प्रदूषणामुळे आणि विस्कळीत झालेल्या लाईफस्टाईलमुळे केस गळण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. जर केसांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर केस गळण्यासोबतच रुक्षसुद्धा होतात. लाईफस्टाईलसह आपल्या डाएटचादेखील केसांवर परिणाम होऊ शकतो. पोषक तत्व असलेले डाएट घेणाऱ्या लोकांचे केस हेल्दी राहतात. केस गळण्याचे अनेक कारणे असू शकतात. जसे अनुवांशिकता, तणाव, इन्फेक्शन हार्मोन्सचे असंतुलन, शरीरातील अपुरे पोषक तत्व, व्हिटामिन केस गळण्याचे असे अनेक कारणे असू शकतात.

यासोबतच साबण किंवा शाम्पूचा अयोग्य वापर केल्यानेदेखील केस तुटतात. दररोज 100 केस गळणे सामान्य गोष्ट आहे परंतु त्यापेक्षा जास्त केस गळणे धोक्याचे ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला केस मजबूत करण्याचे काही उपाय सांगणार आहोत.

दही आणि लिंबू- दही आणि लिंबूचे मिश्रण केसांसाठी फायदेशीर ठरते. दह्यामध्ये लिंबुचा रस मिसळून मिश्रण तयार करा. हि पेस्ट अंघोळीआधी केसांना लावा. अर्ध्यातासाने केस धुवून घ्या. या मिश्रणामुळे केस तुटण्यापासून वाचतात तसेच केस मजबूत होतात.

मेंदी आहे फायदेशीर-
केसांना मजबूत करण्यासाठी त्यांना भरपूर पोषण मिळणे गरजेचे आहे. मेंदीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. मेंदीमधील हे पोषक तत्व केसांसाठी फायदेशीर असतात. जर तुम्ही मेंदीमध्ये अंडे आणि दही टाकले तर ही पेस्ट केसांसाठी उपयोगी ठरेल.

दही –
केस गळण्यापासून थांबवायचे असतील तर दही एक उत्तम घरगुती उपाय आहे. केस धुण्यापूर्वी केसांना दही लावा. केस सुखल्यानंतर पाण्याने धुवून काढा.

तणावमुक्त राहा –
केस गळती थांबवण्यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलची विशेष काळजी घ्यावी लागेल. आहारात व्हिटामिन्स कमतरता असेल तर त्याकडे लक्ष द्यावे. तसेच तणावापासून दूर राहावे. धुम्रपान, अल्कोहोलचे करणे टाळावे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.