कुस्तीच्या आखाड्यात पैलवान निलेश कंदूरकरला दुखापत, मृत्यूशी देतोय झुंज

0

20 वर्षीय तरुण पैलवान निलेश कंदूरकर गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली आहे. त्याच्यावर कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याला मुंबईला हलवण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. मात्र रस्त्यातच त्याची प्रकृती बिडली आणि त्याला कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले. तो सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत.

ज्येतिबा यात्रेनिमित्त कोल्हापूरातील बांदिवडे गावात कुस्तीच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी कुस्ती सुरु झाली आणि प्रतिस्पर्धी पैलवानाने निलेशला उचलून जमिनीवर आपटले. या डावात निलेशच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर तो उठलाच नाही.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.