‘कुंकू’ मालिकेतील अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे रेल्वे अपघातात निधन

0

झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या ‘कुंकू’ मालिकेतून लोकप्रिय झालेला नवखा अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे रेल्वे अपघातात निधन झाल्याची घटना घडली आहे. प्रफुल्लच्या अकाली मृत्यूमुळे मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे.

सोमवारी (22 जानेवारी) पहाटे झालेल्या रेल्वे अपघातात प्रफुल्ल कैलास भालेरावला प्राण गमवावे लागले. मुंबईत मालाडजवळ प्रफुल्लला अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. झी मराठी वाहिनीवर गाजलेल्या ‘कुंकू’ मालिकेत त्याने जानकीचा भाऊ ‘गण्या’ची भूमिका वठवली होती. या भुमिकेमुळे प्रफुल्ल खूप लोकप्रिय झाला होता.

कलर्स वाहिनीवरील ‘तू माझा सांगती’, ‘आवाज- ज्योतिबा फुले’ तसेच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नकुशी’ या मालिकांमधील त्याच्या भूमिका लोकप्रिय झाल्या होत्या. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘बारायण’ चित्रपटतही प्रफुल्ल झळकला होता. याशिवाय काही चित्रपट, मालिकांमध्ये काम करुन त्याने स्वतःची ओळख निर्माण केली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.