काही तासांत लाइमलाईटमध्ये आलेल्या प्रियाच्या विरोधात हैदराबादमध्ये तक्रार दाखल 

0

‘ओरू अडार लव’ या मल्याळम चित्रपटातून एका रात्रीतून लाइमलाईटमध्ये आलेली नवोदित अभिनेत्री प्रिया प्रकाश वारिअर आणि निर्माताच्या विरोधात हैदराबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटातील प्रदर्शित झालेल्या पहिल्या गाण्यातील शब्दावर आक्षेप घेऊन ही तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदारांच्या सांगण्यानुसार या गाण्यातील शब्दामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. प्रियाचा हा व्हिडिओ ‘ओरू उदार लव’ या चित्रपटातील एका गाण्याचा आहे.

शाळेच्या गॅदरिंगमध्ये एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थिनीकडे एकटक बघतो. दोघांमध्ये नजरानजर होते. या तरुणीने नजरेने दिलेले हावभाव अगदी मनाला भेदणारे आहेत.

या एका छोट्याशा व्हिडिओमुळे तिने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर केवळ 20 तासांमध्येच 10 लाखांपेक्षा जास्त हिट्स या गाण्याला मिळाले आहेत. तसेच 50 हजारांपेक्षा जास्त यूझर्सनी हा व्हिडिओ लाईक केला होता.

 प्रियाचा आणखी एक व्हिडिओ झाला रिलीझ –

या व्हिडीओमध्ये दोघेही वर्गात एकमेकांसोबत फ्लर्ट करत आहे. प्रिया प्रकाशचा हा डेब्यू चित्रपट आहे. ती पहिल्याच चित्रपटातून लोकप्रिय झाली. मंगळवारी म्हणजे 13 फेब्रुवारीला या चित्रपटाचा टीझर रिलीझ झाला. हा चित्रपट 3 मार्चला प्रदर्शित होत आहे.

 कोण आहे प्रिया –

18 वर्षांची प्रिया केरळातील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये बीकॉमचे शिक्षण घेत आहे. प्रिया फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्राम पेजवर तिचे डान्स, मॉडेलिंग आणि अभिनयाच्या कारकीर्दीतील अनेक फोटो तुम्हाला दिसतील.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.