काळवीट शिकार प्रकरण : सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा, 10 हजार रुपये दंड

0

20 वर्षांपूर्वी काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान दोषी ठरला आहे. कोर्टाने सलमान खानला 5 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सलमानला कलम 51 म्हणजेच वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत दोषी ठरवले असून सलमानला सेंट्रेल तुरुंगात नेले जाईल. मात्र त्याचे सहकारी सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम यांना कोर्टाने निर्दोष ठरवले आहे. कोर्टाचा निर्णय ऐकताच सलमानच्या दोन्ही बहिणींना रडू कोसळले.

जोधपूर एअरपोर्टवर तब्बू 

1998 मधील हे प्रकरण आहे. सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम यांच्यावर काळवीटची शिकार केल्याचा आरोप होता. राजस्थानमध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना काळवीटाची शिकार केली होती. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत काळवीटाची शिकार करणे प्रतिबंधित आहे. आज अखेर या प्रकरणावर अंतिम निकाल देण्यात आला आहे. सलमान खान विरोधात वन्यजीव संरक्षण कायदा, कलम 51 आणि अन्य कलाकारांविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा, कलम 51 आणि भारतीय दंड विधान कलम 149 अंतर्गत बेकायदेशीरपणे एका ठिकाणी जमण्याचा गुन्हा दाखल आहे.

जोधपूर एअरपोर्टवर नीलम कोठारी पतीसोबत 

काय आहे प्रकरण?

जोधपूरमध्ये ऑक्टोबर 1998मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. सलमान खान, सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे शूटिंगसाठी जोधपूरमध्ये होते. जोधपूर जवळ असलेल्या कांकाणी गावात 2 काळवीटांची शिकार केल्याचा आरोप यांच्यावर लावण्यात आला. बिष्णोई समाजाच्या तक्रारीनंतर कलाकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 10 ऑक्टोबर 1998 रोजी अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम यांना अटक करून त्वरीत जामीन दिला. तसेच 12 ऑक्टोबर 1998मध्ये अभिनेता सैफ अली खानला अटकपूर्व जामीन मिळाला. सलमान खानला जयपूरमधील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून एअर रायफल आणि बंदुकीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. 14 ऑक्टोबर 1998 मध्ये सलमानला जामीन मंजूर झाला.

जोधपूर एअरपोर्टवर सैफ अली खान 

कोणकोणत्या प्रकरणात तक्रार दाखल?

1. कांकाणी केस : या प्रकरणात 5 एप्रिलला निकाल दिला जाणार आहे. यात गोळीचा आवाज ऐकून गावकरी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी सलमान आपल्या सहका-यांसोबत गाडीतून पळून गेला होता. दोन्ही काळवीटांचे मृत शरीर तिथेच पडलेले होते.
2. घोडा फार्म हाऊस केस : 10 एप्रिल 2006 मध्ये सीजेएम कोर्टाने 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. सलमानने हायकोर्टात धाव घेतल्यानंतर त्याची 25 एप्रिल 2016 रोजी सुटका करण्यात आली.
3. भवाद केस : सीजेएम कोर्टाने 17 फेब्रुवारी 2006 रोजी सलमानला दोषी ठरवून एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. हाकोर्टाने या प्रकरणातही सलमानची सुटका केली होती. राज्य सरकारने याबाबत सुप्रीम कोर्टात दाद मागितली.
4. आर्म्स अॅक्ट केस : 18 जानेवारी 2017 ला कोर्टाने सलमानची सुटका केली होती.

जोधपूर एअरपोर्टवर सोनाली बेंद्रे 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.