कल्याणचा नचिकेत लेलेने ठरला ‘सारेगमप’चा विजेता

0

झी मराठी वाहिनीवरील गाजलेला रिअॅलिटी शो ‘सारेगमप- घे पंगा कर दंगा’चा महाअंतिम सोहळा रविवारी (७ जानेवारी) धुमधडाक्यात पार पडला. कल्याणचा नचिकेत लेलेने या कार्यक्रमाचा विजेता ठरला. नचिकेतला ५ लाख रुपये इतके बक्षीस मिळाले.

12 स्पर्धकांना टक्कर देत कल्याणच्या नचिकेत लेलेने बाजी मारुन सारेगमपचे विजेतेपद पटकावले. तसेच यवतमाळचा उज्ज्वल गझधर ही दुसरी तर पुण्याच्या अक्षय घाणेकरने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून बेला शेंडे, स्वानंद किरकिरे, रवी जाधव आणि सूत्रसंचालक रोहित राऊत होते. सलग दहा तास लाईव्ह सुरु असलेल्या अंतिम फेरीत 12 स्पर्धकांमधून या पर्वाचा विजेता निवडण्यात आला. 12 स्पर्धकांनी गायलेली एकापेक्षा एक गाणी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी होती.

या सोहळ्याला बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार आणि सोनम कपूर यांनी ‘पॅडमॅन’च्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.