कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस

0

एम. एम. कलबुर्गी, डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच राष्ट्रीय तपास संस्था, महाराष्ट्र पोलिस, कर्नाटक पोलिस आणि गोवा राज्य सरकार यांनादेखील याबाबत उत्तर मागितले
आहे.

एम. एम. कलबुर्गींची यांची २०१५ मध्ये हत्या झाली होती. मात्र अद्याप या हत्येचा छडा लागला नाही. या संथ गतीच्या तपासामुळे कलबुर्गी यांच्या पत्नी उमा देवी यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे. एसआयटीच्या तपासाबाबत केंद्र सरकारने उत्तर द्यावे, असे आदेश सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए.एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिले आहेत. एम. एम. कलबुर्गी, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांची हत्या एकाच पद्धतीने झाली. या तिन्ही हत्येमागे एकाच संघटनेचा हात असू शकतो, असे कलबुर्गी यांच्या पत्नीने सुप्रीम कोर्टात सांगितले होते. या तिन्ही हत्येचा एकत्र तपास करुन यासाठी विशेष तपास पथक नेमावे, अशी त्यांची मागणी होती.

२० ऑगस्ट २०१३ ला डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे यांची फेब्रुवारी २०१५ मध्ये तर ३० ऑगस्ट २०१५ ला प्रा. कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.