कर्नाटक निवडणूकाची तारिख जाहिर, 12 मे रोजी मतदान, 15 रोजी मतमोजणी

0

कर्नाटक विधानसभा निवडणूकीची तारिख ठरली आहे. 12 मे रोजी मतदान होणार असून 15 मे ला मतमोजणी होईल, याबाबत निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. एकाच टप्प्यात 56 हजार मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. 24 एप्रिल ही अर्ज भरण्याची शेवटची तारिख असून अर्ज मागे घेण्याची तारिख 25 एप्रिल आहे.

28 मे रोजी कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये सत्ता मिळवण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान आहे. यासाठी अमित शहा सध्या कर्नाटक दौ-यावर आहेत. त्यांचा आज तिथे दुसरा आहे.

काँग्रेस – 123
भाजप – 43
जेडीएस – 37
बीएसआरसी – 3
केजेपी – 2
केएमपी – 1
अपक्ष – 8
इतर – 8
एकूण जागा – 225

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.