करमाड येथे भीषण अपघातात १५ जण जखमी, ३ जण गंभीर

0

औरंगाबाद : भरधाव कंटेनरचे टायर फुटल्याने सोमवारी विचित्र अपघातात १५ जण गंभीर जखमी झाले असून १ ट्रॅक्टर, २ अॅपेरिक्षा, २ छोटा हत्ती, २ मोटारसायकल अशा ७ वाहनांचा चुराडा झाला. औरंगाबाद-जालना रोडवर करमाड गावाजवळ कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

कंटेनर हे अवजड सामान घेऊन औरंगाबादेकडून जालन्याकडे जात होते. कंटेनरसमोर ट्रॅक्टर चालले होते. अचानक कंटेनरचे टायर फुटले आणि चालकाचा ताबा सुटला व कंटेनर ट्रॅक्टरवर जाऊन आदळले. भरधाव कंटेनरने ट्रॅक्टरला तसेच जवळपास १०० फूट फरपट नेले. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर दोन्हीही वाहने अडकली. सोमवारी करमाडचा आठवडी बाजार होता. त्यामुळे कापूस खरेदी करणा-या व्यापा-यांनी जालना मार्गावर दुकाने मांडली होती. तसेच झाडाखाली टरबूज व रसवंतीचे दुकानदेखील होते. बेसावध असलेल्या या ग्रामस्थांवर अचानक कंटेनर व ट्रॅक्टर येऊन धडकले.

 

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.