कमला मिल प्रकरणात अटक झालेल्या विशाल करियाला भेटायला गेला हरभजनसिंह
भारतीय क्रिकेट संघातील फिरकिपटू हरभजनसिंह गुरुवारी (१८ जानेवारी) रात्री मुंबईत कमला मिल आग प्रकरणातील आरोपी विशाल करियाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. पण माध्यमाला याबाबत आधीच माहिती मिळाली होती. त्यामुळे विशाल करियाच्या घराबाहेर मीडिया पाहून हरभजन कारमधून खाली उतरलाच नाही. अखेर मिडियाला घाबरून विशाल करियाला न भेटताच तो परत गेला. विशाल करियाला कमला मिल आग प्रकरणातील आरोपींना लपण्यासाठी मदत केल्याच्या आरोपात अटक झाली होती.
विशाल करिया विशाल कारिया हा एक बुकी असून त्याचे भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटर्स आणि बॉलिवूड कलाकारांसोबत संबंध आहेत. हरभजनशी त्याची मैत्री बझुप जुनी असल्याचे अनेक पुरावे आहेत. त्यामुळेच हरभजन त्याला भेटण्यासाठी गेला होता आशी चर्चा होत आहे.