कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मनपा खरेदी करणार ४ बायोमेकॅनिकल कंपोस्ट मशीन

0

औरंगाबाद : रविवारी (४ मार्च) कचऱ्यापासून खत तयार करण्यासंदर्भात एका खासगी कंपनीने सादरीकरण केले. त्यानंतर लवकरात लवकर मशीन खरेदी करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. शहरात ४ बायोमेकॅनिकल कंपोस्ट मशीन बसविले जाणार आहेत. येत्या ३ दिवसांत कचऱ्याचा प्रश्न काहीसा सुटेल, अशी आशा महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केली आहे.

मागील १८ दिवसांमध्ये शहरात सुमारे ६ ते ७ हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. यातील ३ ते साडेतीन हजार टन कचऱ्याची मनपाने विल्हेवाट लावली असून यापुढे सुका आणि ओला असा वर्गीकरण केलेलाच कचरा उचलला जाईल. पुढील ३ दिवसांत कचऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात नक्की सुटेल, असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

सादरीकरण केलेल्या या कंपनीचा अनुभव चांगला आहे. देशातही कचरा व्यवस्थापनात चांगले काम असल्याने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा हा चांगला पर्याय ठरू शकतो. आर्थिकदृष्ट्या महापालिकेला या तंत्रज्ञानाने कचऱ्यावर प्रक्रिया परवडेल. कारण वर्गीकरण झाल्याने निम्मा कचरा कमी होईल. याशिवाय वाहतुकीचा, इंधनाचा व कामगारांवर होणारा खर्च कमी होईल. सद्य:स्थितीत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. यासाठी बायोमेकॅनिकल कंपोस्टिंगच्या ४ मशीन खरेदी केल्या जाणार आहेत.

अधिकाऱ्यांची ३ ठिकाणी पाहणी…

मनपाच्या वतीने मशीन खरेदी करण्याचा निर्णय झाल्यानंतर शहर अभियंता पानझडे, कंपनीचे अधिकारी व सीआरटीच्या गौरी मिराशी यांनी सेंट्रल नाका, एन-१ येथील सेंट झेवियर्स शाळेजवळ आणि एन- ५ येथील कम्युनिटी सेंटरची पाहणी केली

गांधेली, कांचनवाडीतील नागरिकांना धमक्या…

पश्चिम मतदारसंघातील कांचनवाडी, नक्षत्रवाडी, गोलवाडी, छावणी परिषद, मिटमिटा, तीसगाव परिसरात कचरा टाकण्यास विरोध झाल्यानंतर पालिकेने गांधेलीतील खदानींच्या रिक्त जागांचा शोध घेतला आहे, तेथे कचरा टाकण्याची तयारी सुरू केली आहे. याविषयी माहिती मिळताच ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांनी तातडीने बैठक घेतली. बैठकीत परिसरात कचरा टाकण्यास विरोध करण्यात आला. दरम्यान, गांधेलीतील नागरिकांना मनपा प्रशासनाकडून पोलीस कारवाईच्या धमक्या देण्यात आल्यामुळे मनपाच्या विरोधात ग्रामस्थांनी दोन हात करण्याची भूमिका घेत एकतेची वज्रमूठ आवळली आहे, तर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी पश्चिम मतदारसंघात कुठेही कचरा डेपोसाठी जागा देणार नसल्याचा निर्धार करून जनआंदोलन उभे करण्याचा इशारा रविवारी दिला. त्यांनी कांचनवाडी, नक्षत्रवाडी, गोलवाडी, छावणी परिषद, मिटमिटा, तीसगाव, गांधेली परिसरात नागरिकांच्या भेटी घेत आंदोलनाचा इशारा दिला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.