औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी कंपन्यांचे २० टक्के पाणी कपात

0

औरंगाबाद : उन्हाळा लागल्याने शहराची पाण्याची मागणी दुप्पट झाली आहे. महापालिका पुरेसे पाणी देऊ शकत नसल्याने शहरातील नगरसेवकांकडून पाण्यासाठी ओरड सुरू झाली आहे. सोमवारी (१९ मार्च) सर्वसाधारण सभेत पाण्याचा प्रश्न आक्रमकरित्या उपस्थित केला होता. त्यामुळे पैठण रोडवरील ज्या कंपन्यांना महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो, त्या कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात २० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबादला दररोज २०० एमएलडी पाण्याची गरज भासत असताना महापालिका ४ किंवा ८ दिवसाआड पाणीपुरवठा करत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणी प्रश्न पेटतो. यावर्षी मात्र मार्च महिन्यातच पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. शहरातील ११५ वॉर्डांत महापालिका कुठे चार तर कुठे सहा दिवसाआड पाणी देत आहे. शहराच्या आजूबाजूला असलेल्या गुंठेवारी अंतर्गतातील अनेक वसाहतींना मागील अनेक वर्षांपासून महापालिका टँकरने पाणीपुरवठा करत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.