औरंगाबाद: झोक्याचा फास लागून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

0

झोका खेळताना गळफास लागल्याने एका चौदा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (१५ जानेवारी) औरंगाबाद येथील मुकुंदवाडी परीसरातील प्रकाशनगर येथे घडली. करण गुंजाळ असे या मुलाचे नाव असून तो १४ वर्षांचा आहे. तो आठवीत शिकत होता.

सोमवारी शाळेतून घरी आल्यानंतर करण झोका खेळण्यासाठी घराच्या वरच्या मजल्यावर गेला. झोका खेळत असताना अचानक त्याच्या गळ्याला झोक्याच्या दोरीचा फास लागला आणि तो बेशुद्ध पडला. काही वेळानंतर त्याची बहीण त्याला बोलावण्यासाठी वरती गेल्यानंतर तिने आरडाओरड केली असता हा प्रकार उघड झाला. करणला उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी करणला तपासून मृत घोषित केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.