औरंगाबादेतील माणिक हॉस्पिटलला लागलेल्या आगीत काही रुग्ण किरकोळ जखमी

0

औरंगाबाद : येथील गारखेडा परिसरात असलेल्या माणिक रुग्णालयाला सोमवारी (2 एप्रिल) अचानक आग लागल्याने सर्वत्र खळबळ उडाली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या आगीत काही रुग्ण किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.

रुग्णालयाच्या तळमजल्यावर काम सुरु होते, तेव्हाच ही आग लागली. तळमजल्यावर लागलेल्या आगीने रौद्र रुप धारण केले आणि आग वरच्या मजल्यापर्यंत पसरली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

आग विझवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करण्यात आले. सुमारे 40 रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. तसेच अॅम्बुलन्समधून रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.