औरंगाबादच्या मनपा आयुक्तपदी निपुण विनायक

0

औरंगाबाद : पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतर <br />मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर तडकाफडकी बदली करण्यात आली. आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे तात्पुरता देण्यात आला आहे. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारचे उपसचिव निपुण विनायक यांची महानगरपालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

मागील २८ दिवसांपासून शहरातील कचराकोंडी कायम आहे. हा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी महापालिकेला सक्षम आयुक्ताची गरज असल्याची मागणी विधानसभेत लोकप्रतिनिधींनी केल्याचे समजते. या पार्श्वभुमीवर निपुण विनायक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. हगणदारी मुक्त अभियानात निपुण विनायक यांचे मोठे योगदान आहे. सध्या त्यांच्याकडे स्वच्छ भारत मिशनचे संचालक पद आहे. 

मिटमिट्यात कचरा नेण्याचे आदेश ज्या मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिले होते त्यांचीही बदली करण्यात आली. मुगळीकर यांची औरंगाबाद येथील वैधानिक विकास महामंडळाच्या संचालक पदावर बदली करण्यात आली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.