औरंगाबादचे पोलिस आयुक्त सक्तीच्या रजेवर, कचराकोंडीवरून विरोधक आक्रमक

0

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडीच्या प्रश्नावरुन विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (१५ मार्च) सभागृहात याबाबत घोषणा केली आहे.

आज सकाळपासून विरोधकांनी औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्नाच्या मुद्द्यावरून सभागृहाचे कामकाज रोखून धरले होते. शहरात निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीसाठी महापालिका व पोलीस आयुक्तांना जबाबदार धरून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा पवित्राच विरोधकांनी घेतला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी याबाबत कारवाई करून पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद कचरा प्रश्नाला हिंसक वळण आले होते. मिटमिटा आणि पडेगाव परिसरात कचऱ्याच्या गाड्या पेटवून दिल्याने पोलिसांनी नागरिकांच्या घरावर दगडफेक करून त्यांच्यावर लाठीचार्ज केला होता.

तसेच अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) व पोलिस महासंचालक यांची समिती या प्रकरणाची चौकशी करणार असून तोपर्यंत औरंगाबादच्या पोलिस महानिरीक्षकांकडे आयुक्तपदाचा भार देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.