औरंगाबादची झाली कचराकोंडी, ५ दिवसांत साचला २००० टन कचरा

0

औरंगाबाद शहराची सध्या कचराकुंडी झाली आहे. मागील ५ दिवसांपासून नारेगावच्या नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध केल्यामुळे शहरातील रस्त्यांवर २००० टनपेक्षा जास्त कचरा साचला आहे. महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यां यावर अद्याप तोडगा काढता आला नाहीये. मात्र औरंगाबादच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे शहरात गंभीर परिस्थिती उद्धभवू शकते लक्षात येताच मनपा प्रशासनाने डॉक्टरांच्या रजा रद्द केल्या. तसेच खासगी रुग्णालयांनाही सतर्कतेचे आदेश दिले.

शहरातील रस्ते तसेच गल्लीत देखील कचऱ्याचे डिगार दिसून येत आहेत. सहाव्या दिवशीही कचराकोंडीवर तोडगा काढण्यात औरंगाबाद महापालिका अपयशी ठरली आहे. महापालिकेचा कचरा डेपो म्हणजे नारेगाव येथील नागरिक अजूनही डेपोत कचरा टाकू न देण्यावर ठाम आहेत. 15 वर्षांपूर्वी हायकोर्टाने नारेगावचा कचरा डेपो बंद करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र अद्यापही हा डेपो बंद करण्यात आला नाही. महापालिकेला पर्यायी जागा मिळाली नसल्याने नारेगावचे लोक आता रस्त्यावर उतरले. दिवसेंदिवस शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून महापालिकेच्या सगळ्या कचरा उचलणाऱ्या गाड्या कचरा भरून तशाच उभ्या आहेत. आता हा कचरा कुठे टाकायचा असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. सध्या कचऱ्याची दुर्गंधी येऊ न६ये म्हणून त्यावर पावडर टाकली जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.