ऑस्करवर ‘द शेप ऑफ वॉटर’ने उमटवली मोहर, शशी कपूर-श्रीदेवी यांना वाहिली श्रद्धांजली

0

 लॉस अँजलिस : ९० वा ऑस्कर पुरस्कार सोहळा थाटात पार पडला. हॉलिवूडमधील सर्वाधिक प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यावर द शेप ऑफ वॉटर चित्रपटाने मोहर उमटवली. ऑस्करच्या शर्यतीत ‘द शेप ऑफ वॉटर’ ही फिल्म अव्वल ठरली आहे. ‘द शेफ ऑफ वॉटर’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे १३ नामांकने मिळाली होती. त्या पाठोपाठ ‘मडबाऊंड’ चित्रपटाला ५ तर ‘गेट आऊट’ला ४ नामांकने मिळाली. ऑस्कर सोहळ्यामध्ये बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते शशी कपूर, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

‘द शेप ऑफ वॉटर’ चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे १३ विभागांत नामांकने मिळाली होती. त्यापैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर आणि सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन असे ४ पुरस्कार या चित्रपटाला मिळाले आहेत. १९६२ मधील पार्श्वभूमीवर बाल्टिमोरमध्ये ‘द शेप ऑफ वॉटर’ चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. हाय सिक्युरिटी सरकारी लॅबमधील एक तरुणी मानवसदृश उभयचराच्या प्रेमात गुंतल्याची प्रेमकथा असलेला हा चित्रपट आहे.

दि ऑस्कर गोज टू …….

सर्वोत्कृष्ट चित्रपट : द शेप ऑफ वॉटर

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता : गॅरी ओल्डमन (द डार्केस्ट अवर)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : गिलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)

सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग (मूळ गीत) : रिमेम्बर मी (कोको)

सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर : द शेप ऑफ वॉटर

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण : ब्लेड रनर 2049

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा : गेट आऊट

सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा : कॉल मी बाय युअर नेम

सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन (शॉर्ट) : द सायलेंट चाईल्ड

सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट ; हेवन इज अ ट्राफिक जॅम ऑन द 405

सर्वोत्कृष्ट संकलन : डंकर्क

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स : ब्लेड रनर 2049

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर : कोको

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म : डिअर बास्केटबॉल

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : अॅलिसन जॉने (आय, टॉन्या)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : सॅम रॉकवेल- (थ्री बिलबोर्डस आऊटसाईड ईबिंग)

सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट : अ फँटॅस्टिक वुमन (चिली)

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन आणि सेट डेकोरेशन : द शेप ऑफ वॉटर

सर्वोत्कृष्ट ध्वनिमिश्रण : डंकर्क
सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलन : डंकर्क

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फिचर : इकरस

सर्वोत्कृष्ट वेशभूषा : फॅन्टम थ्रेड

सर्वोत्कृष्ट रंगभूषा, केशभूषा : डार्केस्ट अवर

सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकन…..

कॉल मी बाय यूवर नेम, डार्केस्ट अवर, डंकर्क, गेट आऊट , लेडी बर्ड , फँटम थ्रेड, द पोस्ट, द शेप ऑफ वॉटर, थ्री बिलबोर्ड्स आऊटसाइड इबिंग, मेसुरी

सर्वोत्कृष्ट अभिनेता……
टिमोथी चलामेट (कॉल मी बाय युअर नेम)

डॅनिअल डे-लिवाईस (फँटम थ्रेड)

गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट अवर)

डॅन्झेल वॉशिंग्टन (रोमन जे. इस्रायल, इएसक्यू)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री……

सॅली हॉकिन्स (द शेप ऑफ वॉटर)

फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी)

मार्गो रॉबी (आय टोन्या)

साईरसे रोणान (लेडी बर्ड)

मेरिल स्ट्रीप (द पोस्ट)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन……

ख्रिस्तोफर नोलान (डंकर्क)

जॉर्डन पीले (गेट आऊट)

ग्रेटा गेरविग (लेडी बर्ड)

पॉल थॉमस अँडरसन (फँटम थ्रेड)

गिलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.