ऐश्वर्या-अभिषेक सोडणार अमिताभ यांचा ‘जलसा’ ?

0

मागील काही दिवसांपासून सिनेसृष्टीमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन ‘जलसा’ सोडून मुंबई घेतलेल्या नवीन घरी शिफ्ट होणार असल्याची चर्चा आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी मुंबईमध्ये एका लक्झरीअस अपार्टमेंट घर घेतल्याचे बोलले जात आहे.

सध्या दोघे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासह ‘जलसा’ बंगल्यातच राहतात. मात्र खरच ऐश्वर्या आणि अभिषेक अमिताभ-जया यांना सोडून नव्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे का? असा प्रश्न त्यांच्या चात्यांना पडला आहे.

ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्यातील नाते काहीसे चांगले नसल्याच्यादेखील चर्चा आहेत. त्यामुळे दोघे नविन घरी शिफ्ट होत आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्याने मुंबईमध्ये २१ कोटी रुपयांचा एक लक्झरीअस फ्लॅट घेतला आहे. मात्र, सध्या अभिषेक आपले कुटुंब सोडून कोठेही जाणार नाही, असेही बोलले जात आहे. तो त्याच्या आई-वडिलांना कधीच सोडू शकत नाही. याच कारणामुळे त्याचा करिश्मासोबतचा साखरपुडा मोडल्याचीही चर्चा झाली होती.

यापूर्वी करिश्मा कपूरसोबत नाते तुटण्याचेही, असेच कारण सांगितले जात होते. लग्नानंतर करिश्माची वेगळी राहण्याची इच्छा होती. मात्र याला अभि‍षेकचा विरोध होता.

अभिषेक आणि ऐश्वर्याने मुंबईमध्ये २१ कोटी रुपयांचा एक लक्झरीअस फ्लॅट घेतला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.