एअरपोर्टवर वॉर्नर झाला भावूक, पत्नीलाही रडू आवरेना

0

बॉल टॅम्परिंगच्या वादात अडकलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टिव्ह स्मिथला आरोप सिद्ध झाल्यानंतर रडू आवरले नाही. तो पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला. तसेच स्टिव्ह स्मिथनंतर डेव्हिड वॉर्नरही या वादात आरोपी सिद्ध झाला आहे. तो ऑस्ट्रेलियन सिडनीला पोहोचला आहे.

यादरम्यान, त्याच्यासोबत पत्नी कँडिस आणि दोन्ही मुली होत्या. सिडनीला एअऱपोर्टवर पोहोचताच वॉर्नर आणि त्याच्या पत्नीला रडू कोसळले. बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी ठरल्यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षांची बंदी घातली आहे. यावेळी वॉर्नर म्हणाला, ‘माझ्या कुटुंबासाठी हा अत्यंत कठिण काळ आहे. मी येत्या काही दिवसांतच या प्रकाराबाबत बोलेन.’

वॉर्नरपूर्वी स्मिथसुद्धा मिडियसमोर ढसाढसा रडला आणि माफी मागितली होती. त्यानंतर क्रिकेट क्षेत्रातील अनेकांनी त्याच्याबद्दल संवेदना व्यक्त केल्या होत्या.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.