उदयनराजे, शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांना जामीन, रुग्णालयातच केला डान्स

0

आजारपणाचा बनाव करून रुग्णालयात दाखल झालेल्या आरोपींनी जामीन मिळताच रुग्णालयातच डान्स केल्याचा प्रकार साताऱ्यात येथे घडला.

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आनेवाडी टोलनाक्याच्या वर्चस्वावरून वाद आहे. या वादातून झालेल्या राड्याप्रकरणी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यातील काही जणांनी दुखण्याचे कारण करून रुग्णालयात दाखल करण्याची विनंती केली होती. त्याचवेळी त्यांच्या जामीनाची प्रक्रिया सुरु होती. जामीन मिळाल्याचे वृत्त कळताच या आरोपींनी रुग्णालयातच डान्स केला. विशेष म्हणजे एकमेकांना मारहाण करणारे दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसोबत डान्स करताना दिसत आहेत.

प्रताप क्षीरसागर, चेतन सोळंकी, निखील वाडकर, उत्तम कोळी, अनिकेत तपासे, हर्षल चिकणे, नितीन समोडमिसे, प्रतिक शिंदे यांना जामीन मिळाला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.