इराकमधून बेपत्ता झालेल्या ३९ भारतीयांचा मृत्यू, सुषमा स्वराज यांची राज्यसभेत माहिती

0

इराकच्या मोसूलमध्ये बेपत्ता झालेल्या ३९ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज राज्यसभेत दिली. डीएनए टेस्ट केल्यानंतर मृतदेहांची ओळख पटली आहे. ३९ मृतदेहांचे ७० टक्के नमुने जुळले आहेत. दहशतवादी संघटना ISIS ने त्यांना मारले असल्याचे स्वराज यांनी सांगितले.

२७ जुलै २०१७ मध्ये सभागृहात याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी बाजवा यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उचलला होता. दुसऱ्या दिवशी मी यावर उत्तर दिले होते. त्यावेळी मी म्हणाले होते की, ‘जोपर्यंत पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत मी त्यांना मृत घोषित करणार नाही. पुरावे नसताना एखाद्याला मृत घोषित सरकारसाठी बेजबाबदारपणाचे ठरू शकते. परंतु त्याबाबत पुरावे मिळाले तर याबाबत मी माहिती देईल. आज मी ते वचन पाळायला आले आहे. इराकच्या मोसूलमध्ये बेपत्ता झालेल्या ३९ भारतीय मारले गेले आहेत.’

सुषमा स्वराज यांनी अपहृत भारतीयांच्या नातेवाईकांची स्वत: भेट घेतली होती. तसेच ३९ भारतीयांचा शोध घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करु, असे आश्वासनही दिले होते.

काय आहे प्रकरण?
२०१४ मध्ये इराकमधील मोसूल भागातून जून महिन्यात ISIS या दहशतवादी संघटनेने ४० भारतीयांचे अपहरण केले होते. या ४० जणांपैकी एकटा हरजीत मसीहची सुखरुप सुटका झाली होती. मात्र या ३९ भारतीयांबाबत काहीच माहिती मिळाली नव्हती. ISIS या दहशतवादी संघटनेने माझ्यासमोरच या ३९ जणांना मारल्याचा दावा हरजीत मसीहने केला होता.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.