इंद्राणी-पीटर मुखर्जी समोर बसवून सीबीआय करणार कार्तीची चौकशी

0

कार्ती चिदंबरमला पुढील चौकशीसाठी सीबीआयने मुंबईत आणले आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी कार्ती चिबंदरम सध्या सीबीआय पोलिसांच्या ताब्यात आहेत. कार्ती चिदंबरमची पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या समोर बसवून चौकशी करण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली. इंद्राणी आणि पिटर मुखर्जी आयएनएक्स मीडियाचे संस्थापक आहेत.

विशेष न्यायालयाने कार्ती चिंबरमच्या पोलिस कोठडीत ६ मार्चपर्यंत वाढ केली आहे. आयएनएक्स मीडिया लाच प्रकरणी अटक झालेल्या माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांचा मुलगा कार्ती चिंदबरम याला आधी ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती.

आयएनएक्स मीडिया प्रकरण हे ८ वर्ष जुने असून त्याची चौकशी पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना सुरू झाली होती. यात कार्ती चिदंबरमच्या १० लाखांची लाच घेतल्याचा आरोप आहे. तसेच सीबीआयला चौकशीत कोणतीही मदत तर नसल्याचाही आरोप आहे. तसेच या तपास प्रक्रियेत राजकीय दबाव आणून कार्ती अडथळे आणत असल्याचा आरोप सीबीआयने केला होता. याप्रकरणी कार्तीला २८ फेब्रुवारीला लंडनहून चेन्नईत पतल्यानंतर विमानतळावरच सीबीआयने अटक केली होती.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.