इंडस्ट्रीत अजयच्या लुक्सची उडवायचे खिल्ली, बिग बी म्हणाले होते ‘डार्क हॉर्स’

0

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. अजयचा जन्म 2 एप्रिल 1969 रोजी झाला. तो बॉलिवूडच्या अॅक्शन हिरोपैकी एक आहे. त्याला गंभीर अभिनेतादेखील म्हटले जाते. त्याने स्वबळावर इंडस्ट्रीत स्वत:चे नाव कमावले आहे. जाणून घेऊया अजयविषयी काही गोष्टी…

* बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट देणारा अजय सध्या ‘तानाजी-द अनसंग योद्धा’ या चित्रपटाच्या तयारित व्यस्त आहे. या चित्रपटात अजय छत्रपती शिवाजी महाराजाच्या मावळ्यापैकी एक नेता सुबेदार तानाजी मालसूरे यांची भूमिका साकारणार आहे. याशिवाय तो आणखी एक रोमँटिक चित्रपट करत आहे. तसेच त्याच्या ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटाच्या सिक्वेलचीदेखील चर्चा आहे.

* अजय देवगणने 1991मध्ये ‘फूल और कांटे’ चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अॅक्टरचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्याने ‘जिगर’, ‘दिलवाले’, ‘सुहाग’, ‘नाजायज’, ‘सिंघम’, ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’ असे अनेक हिट चित्रपट इंडस्ट्रीला दिला.

* अजयला ‘जख्म’ आणि ‘द लिजेंड ऑप भगत सिंग’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अजयने ‘दीवानगी’ चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती, या भूमिकेसाठी त्याचे खूप कौतुक केले होते. 2016मध्ये अजयला ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवले आहे.

* अजयचे खरे नाव ‘विशाल वीरु देवगण’ आहे. आईच्या म्हणण्यावरून त्याने आपले नाव ‘अजय’ ठेवले होते. अजयला कुटुंबीय आणि मित्र परिवार ‘राजू’ नावाने हाक मारतात. त्याचे निक नेम ‘राजू’ आहे. अजयने बी.कॉमची पदवी घेतली आहे. अजय जेव्हा इंडस्ट्रीत आला होता, तेव्हा त्याच्या चेह-याची खिल्ली उडवली होती. एकदा अमिताभ बच्चन अजयला ‘डार्क हॉर्स’ म्हणाले होते.

* अजय देवगणला खूप मोठ्या मुलाखती देणे मूळीच आवडत नाही. तसेच अजयला डान्स करालयलाही आवडत नाही. तो कोणत्याच चित्रपटात डान्स करताना दिसत नाही. अजयला पार्ट्या करण्यातही रुची नाहीये. तो बॉलिवूडमध्ये कोणत्याच पार्टीत दिसत नाही. त्याला काम संपवून घरी जाऊन मुलांसोबत वेळ घालवायला आवडते. कॉलेजमध्ये असताना अजय मित्रांसोबत दोन टु व्हिलरवर एकत्र जात होता. त्याचा हा रिअल लाईफ सीन ‘फूल और कांटे’ चित्रपटात चित्रीत करण्यात आला होता.

* अजयला बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत एकदा काम करण्याची इच्छा आहे. त्याने ‘असर: द इम्पेक्ट’ नावाच्या चित्रपट बनवण्याची तयारी दर्शवली होती. परंतु काही कारणास्तव हा चित्रपट होऊ शकला नाही. अजयला ‘करण अर्जुन’ चित्रपटात सलमान खानची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र त्याने नकार दिला होता. याशिवाय त्याने शाहरुख खानच्या ‘डर’ चित्रपटालाही नकार दिला होता. अजय आणि आमिर खानने नकार दिल्यानंतर शाहरुखला हा चित्रपट भेटला होता.

* अजयने बालकलाकाराच्या रुपात ‘प्यारी बहना’ (1985) चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात अजयने मिथुन चक्रवतीच्या बालपणची भूमिका साकारली होती. अजय प्रकाश झा, राजकुमार संतोषी आणि रोहित शेट्टी यांचा आवडता कलाकार आहे. त्याने यांच्यासोबत अनेक चित्रपट केले आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये अजय संजय दत्त आणि सलमान खानला चांगले मित्र मानतो.

* अजय देवगणच्या ‘हकीकत’ चित्रपटासाठी 4 दिवसांसाठी प्रिती झिंटाने सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. अजयने दिग्दर्शनक म्हणून ‘यू मी और हम’ चित्रपट बनवला होता. त्यात तो पत्नी काजोलसोबत मुख्य भूमिकेत दिसला होता. अजय पहिली अभिनेता आहे, ज्याने शूटिंग आणि पर्सनल कामासाठी 6 सीटरचा प्रायवेट जहाज खरेदी केले आहे.

* अनेक सुपरहिट चित्रपट देणा-या या सुपरस्टारचे काही चित्रपट काही कारणास्तव रद्द झाले होते. महेश भट यांच्या दिग्दर्शनाखाली अजय देवगण आणि पूजा भटचा ‘गिरवी’चे 20 टक्के शूटिंग होऊन चित्रपट बंद पडला होता. ‘सिंगर’ चित्रपट पूर्ण होऊनसुद्धा काही कायदेशीर बाबींमुळे प्रदर्शित होऊ शकला नाही. 1999मध्ये अजयचा ‘कुर्बान तुझ पे मेरी जान’ चित्रपटाची घोषणा झाली होती, या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन आणि फरदीन खान होते. फिरोज खान दिग्दर्शन करणार होते. परंतु घोषणा होऊनही हा चित्रपट होऊ शकला नाही. उमेश मेहराचा ‘जिंदा दिल’ चित्रपटसुद्धास रद्द झाला होता, यात अजयसोबत उर्मिला मातोंडकर होती. अशाप्रकारे अजयचे ‘बरफ’, ‘गुलेल’ आणि अब्बास मस्तानी यांना ‘छलिया’ चित्रपटही अद्याप बनू शकलेले नाहीत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.