आयटी इंजिनिअरने पत्नी व मुलाची हत्या करून केली आत्महत्या

0

पुणे येथील बाणेर-पाषाण लिंक रोडवर एका आयटी इंजिनिअरने पत्नी आणि चार वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नी आणि मुलाची हत्या करुन इंजिनिअरने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जयेशकुमार पटेल (वय 34) असे आत्महत्या करणाऱ्या इंजिनिअरचे नाव असून पत्नीचे नाव भूमिका पटेल (वय 30) तर मुलाचे नाव नक्ष (वय 4) आहे. जयेशकुमार पटेल हे आयटी इंजिनिअर होते. ते एका नामांकीत कंपनीत दीड लाख रु. महिना पगारावर नोकरीला होते. त्यांची पत्नी गृहिणी होती.

गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे घर आतून बंद होते. त्यामुळे शेजार्‍यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रात्री 11 वाजता याविषयी माहिती दिली. चतुरशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुसऱ्या इमारतीच्या बाल्कनीतून पोलिस पटेल यांच्या घराजवळ पोहचले. दार तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी पोलिसांना पटेल यांचे संपूर्ण कुटुंब मृत्य अवस्थेत आढळून आले.

पती-पत्नीच्या गळ्याभोवती दोरीचे व्रण होते तर मुलगा नक्ष याच्या तोंडातून फेस आला होता. या आत्महत्येचे कारण नेमके कळू शकलेले नाही. त्यांचे मृत्यदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.