‘आपला मानूस’चा टीझर रिलीज, नाना पाटेकर मुख्य भूमिकेत

0

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण निर्मित ‘आपला मानूस’ मराठी चित्रपटचा टीझर रिलीज झाला आहे. अभिनेते नाना पाटेकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.

नाना पाटेकर गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती नागरगोजे ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. ‘आपल्याला जमेल तेवढाच चांगुलपणा दाखवावा, आपण काय गांधी नाही’ यासारखे दमदार डायलॉग टीझरमध्ये आहेत. उत्सुकता निर्माण करणारा हा टीझर आहे.

काही दिवसांपूर्वी अजय देवगणने ट्विटरवर ‘आपला मानूस’ चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला होता. पोस्टरमध्ये एका पावसाळी रात्री नाना पाटेकर बाईक चालवताना दिसत आहेत. ‘हा सैतान बाटलीत मावनार नाय’ असे एक वाक्य पोस्टरवर टाकण्यात आले होते. येत्या 9 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत नाना पाटेकर आहेत. तसेच दिग्दर्शन सतीश राजवाडे करत असून अजय देवगणची निर्मिती आहे.नाना यांच्यासोबत सुमीत राघवन, इरावती हर्षे या चित्रपटात झळकणार आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.