आदित्य ठाकरेंची नेतेपदी निवड, शिवसेना स्वबळावर लढवणार निवडणूका

0

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक पार पडली आहे. यात आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचे नेतेपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर युवासेना प्रमुख पदांवर आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली असून शिवसेना पक्षप्रमुख पदावर पुन्हा उद्धव ठाकरेच असणार आहेत अशी घोषणा गुलाबराव पाटील यांनी केली. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून फेरनिवड होणे गरजेचे होते. ही निवडणूक मुंबईत वरळीमधील नॅशनल स्पोर्टस कॉम्प्लॅक्समध्ये झाली.

तसेच शिवसेना या नंतरच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचा ठरावही मंजूर झाला आहे. कार्यकारणी सभेबाहेर शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला.

शिवसेना या पुढच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच्या ठरावाला सर्व मंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेना लोकसभेत २५ जागा आणि विधानसभेत १५० जागा स्वबळावर लढवणार आहेत. शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत एकनाथ शिंदे, चंद्रकात खैरे, अनंत गीते, आनंदराव अडसूळ यांच्या नावाची नेतेपदी घोषणा करण्यात आली असून मिलिंद नार्वेकर शिवसेनेचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.