आता मुंबई पोलिस करणार 8 तास ड्युटी

0

मुंबई पोलिसांसाठी 17 जानेवारी हि तारीख चांगलीच अविस्मारणात राहणार आहे. कारण आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मुंबई पोलिसांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. मुंबई पोलिसांची ड्युटी आता केवळ 8 तासांची करण्यात आली आहे.

‘मिशन 8 अवर्स’ या कार्यक्रमात मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ही घोषणा केली असून मुंबई पोलिसांना सुखद धक्का दिला आहे. एकदा घरातून बाहेर पडलेले पोलिस कधी 12 तासांनी, कधी 16 तर कधी 24 तासांनी घरी परत जात होते. त्यामुळे पोलिसांचे आरोग्य, मानसिकता, कौटुंबिक आयुष्य या सर्वांवर त्याचा परिणाम होत होता. या सर्व बाबी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी आहे, तेच एकप्रकारे असुरक्षित आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामाचे तास निश्चित करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून होत होती.

ही मागणी लक्षात घेऊन आयुक्तांनी अखेर पोलिसांच्या कामाचे तास निश्चित केले आहेत. आजपासून मुंबईतल्या सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये 8 तासांच्या शिफ्टची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

गेली वर्षभर मुंबई पोलिस दलातील देवनार आणि नंतर काही पोलिस स्टेशन मध्ये ही “ऑन ड्युटी ८ तास” संकल्पना राबवण्यात आली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.