आज मुंबईत एल्गार मोर्चा, गोंधळ झाल्यास सरकार जबाबदार – आंबेडकर

0

भीमा-कोरेगाव हिंसेप्रकरणी संभाजी भिडे यांना अद्याप अटक न केल्याने त्या निषेधार्थ आज मुंबईमध्ये एल्गार मोर्चा काढण्यात आला आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. आम्ही कुणालाही त्रास न देता मोर्चा काढणार आहोत, अगदी शांततेत हा मोर्चा पार पडेल. परंतु मोर्चादरम्यान गोंधळाची परिस्थिती उद्धभवल्यास त्याला सरकारच जबाबदार राहिल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. सकाळी 11 वाजता सुरुवात झालेला हा मोर्चा सीएसटीवरून आझाद मैदानाकडे निघणार आहे. काही गोंधळ होऊ नये, म्हणून मुंबई पोलिसांनी सकाळपासूनच कडेकोट बंदोबस्त केला आहे.

जिजामाता उद्यानापासून मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे जमण्याचे आवाहन केले आहे. राज्यातून विविध भागातील कार्यकर्ते जमले आहेत. या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे. सर्वजण जमल्यानंतर मोर्चा कुठे जाणार हे ठरवले जाईल असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, लिंगायत सेवा संघ, ओबीसी परिषद, मागासवर्गीय कर्मचारी संघटनांनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे. सध्या राज्य विधिमंडळाचे मुंबईमध्ये अधिवेशन सुरु आहे. त्यात पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.