आज खग्रास चंद्रग्रहण, ‘सुपरमून’, ‘ब्लूमून’ व ‘ब्लडमून’चे दिसेल विलोभनीय दृश्य

0

नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच खगोलप्रेमींना दोनवेळा ‘चंद्रा’चे विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी मिळाली आहे.
आज खग्रास चंद्रग्रहण आहे. खग्रास चंद्रग्रहणास सुपरमून आणि ब्लूमून असा तिहेरी योग जुळून आला आहे. जानेवारी महिन्यात दोनवेळा ‘सुपरमून’चे दर्शन झाले आहे. आज (31 जानेवारी) सायं. 6 वाजून 25 मिनिटांपासून रात्री 7 वाजून 38 मिनिटांपर्यंत साध्या डोळ्यांनी सुपरमून, ब्ल्यूमून आणि ब्लडमूनचे आपल्याला दर्शन घेता येणार आहे.

आज (31 जानेवारी) सायंकाळी 5 वाजून 18 मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होणार असून सायं. 6 वाजून 21 मिनिटांनी चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्यास खग्रास स्थितीला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीत चंद्रोदय होईल आणि आपल्याला साध्या डोळ्यांनी सुपरमून, ब्ल्यूमून आणि ब्लडमूनचे दर्शन होणार आहे. ग्रहण सायं. 7 वाजता आहे. त्यावेळी चंद्रबिंब पूर्व आकाशात वरती आलेला दिसणार आहे. सायं. 7 वाजून 38 मिनिटांनी खग्रास स्थिती संपेल. रात्री 8 वाजून 42 मिनिटांनी ग्रहण सुटणार आहे.

काय आहे सूपरमून?
चंद्राचा आकार सामान्य स्थितीपेक्षा अधिक मोठा दिसतो, त्याला सूपरमून असे म्हटले जाते. यादरम्यान चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. मात्र सुपरमून ही संज्ञा खगोलशास्त्रीय नसून रिचर्ड नोले यांनी 1979 मध्ये हे नाव दिले. अशावेळी चंद्रबिंब 14 टक्के मोठे आणि 30 टक्के अधिक प्रकाशित दिसते.

काय आहे ब्लूमून?
एकाच महिन्यात दोनवेळा पौर्णिमा येते, तेव्हा दुसऱ्या चंद्राच्या पौर्णिमेला ‘ब्लूमून’ म्हणतात. यावर्षी 2 जानेवारीला पौर्णिमा होती, दुसरी पौर्णिमा आज म्हणजे 31 जानेवारीला आहे.

काय आहे ब्लडमून?
पृथ्वीची सावली जेव्हा संपूर्ण चंद्रमाला झाकून टाकते. तरीदेखील सूर्याची काही किरणे चंद्रमापर्यंत पोहोचतात. खग्रास स्थितीत संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने पौर्णिमा असूनदेखील चंद्रबिंब लाल, तपकिरी रंगाचा दिसतो. म्हणून त्याला ‘ ब्लडमून ‘ म्हटले जाते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.