अहमदनगरच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड

0

अहमदनगर महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेतल्याने बोरुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. श्रीपाद छिंदम यांच्या निलंबनानंतर नगरचे उपमहापौर पद रिक्त झाले होते.

उपमहापौरपदाची निवडणूक प्रक्रिया सुरु असताना राष्ट्रवादी, मनसे आणि बंडखोर गटाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
छिंदम यांच्या प्रकरणानंतर भाजपने प्रायश्चित्य म्हणून आधीच निवडणुकीतून माघार घेतली होती. तसेच भाजप निवडणूक प्रक्रियेतही सहभागी झाले नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द अपशब्द काढल्याने श्रीपाद छिंदमला गेल्या महिन्यात उपमहापौरपदावरुन निलंबित करण्यात आले होते.

अहमदनगर महापालिकेत २६ फेब्रुवारी रोजी भाजपचा बडतर्फ उपमहापौर श्रीपद छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. तसेच छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.